भोकरच्या विकासाला नवी दिशा: नवनिर्माण कारभार व नागरी सुविधांवर भर: नुतननगराध्यक्ष भगवान दंडवे

प्रतिनिधी, भोकर येथील भोकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड न करता प्रामाणिक,लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार राबविण्याचा निर्धार नुतननगराध्यक्ष भगवान दंडवे यांनी व्यक्त केला. नागरी सुविधा सक्षम करणे आणि नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्षपदी निवड झाल्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत दंडवे बोलत होते. यावेळी शहरातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान दंडवे म्हणाले, शहराचा विकास हा केवळ इमारतींपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हेच खरे विकासाचे लक्षण आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, वीज, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देत योजनाबद्ध पद्धतीने काम केले जाईल.नगरपालिकेच्या प्रत्येक निर्णयात पारदर्शकता ठेवून नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. घटकांना सोबत घेऊन सामूहिक प्रयत्न करण्यात येतील,असे नमूद करत त्यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “एकजुटीने काम केल्यास भोकरचा चेहरामोहरा बदलणे अशक्य नाही. चला, एकत्र येऊन

भोकरच्या विकासाचा नवा अध्याय लिहूया, “असे आवाहन

त्यांनी केले पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध शहरातील प्रश्नांवर नगराध्यक्ष दंडवे यांनी स्पष्ट, विकासाभिमुख भूमिका मांडली. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे भोकरच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या आशा सकारात्मक व

शहराच्या विकासासाठी सर्व निर्माण झाल्या आहेत.

Leave a Reply