राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन: पोलिस निरीक्षक मा,अजित कुंभार
भोकर तालूका प्रतिनिधी : भोकर पोलीस स्टेशन भोकर यांच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूसह युवक युवतीने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. अजित कुंभार यांनी केले आहे. राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन भोकरतर्फे दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.00 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भोकर शहरातील उमरी चौक – वस्ताद लहुजी चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस स्टेशन भोकर पर्यंत दोन किलोमीटर अंतराची राहणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. तरी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी पोलीस स्टेशन भोकर येथे रूम नंबर 21 मधील पोलीस अंमलदार परमेश्वर गाडेकर यांच्याकडे आपल्या ओळखपत्रासह नाव नोंदणी करावी असे आवाहन पोलीस स्टेशन भोकर चे पोलीस निरीक्षक श्री अजित कुंभार यांनी केले आहे.
