भोकर :तालुक्यात व ग्रामीण परिसरात गाव वस्तीत सुमारे अनेक गावे असून या ठिकाणी सर्वच महसुली व्यवहार महसुली विभागाकडून होत. असतात मग त्या मध्ये शेतकऱ्याचे काम असो किंवा उत्खनन ,फेरा फार,उत्पन्न इत्यादी कामे येत असतात मात्र सुमारे कित्येक पोलीस स्टेशन पार करून उमरी व मुदखेड मार्गे भोकर तालुक्यात व परीसरात रोज रात्रीला सकाळी तब्बल २५ ते ३० टिपर चालू असतात त्यांना कोणतेही रॉयल्टी नाही. जिल्हा अधिकारी किंवा भोकर महसूल विभागाकडून या बोगस रॉयल्टी ची तपासणी केली जात नाही. कारण उघड पणे अवैध रेती वाहतूक करणारे टिपर चालक आम्ही भोकर येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून वाहतूक करत असल्याचे बोलत असतात तेव्हा महसूल प्रशासनातील तो आका कोण, ही चर्चा असून महसूल विभागाच्या छुप्या पाठीब्या मुळे रेती तस्कर यांनी भोकर शहरात व तालुक्यात अवैध वाहतूक रेतीचा उच्छाद गाठला आहे ..

भोकर तालुक्याच्या ठिकाणी व तसेच परीसरात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असून या ठिकाणी प्रत्येक गावात सुमारे घरकुल बांधकाम ५० ते २०० पासून असे बऱ्याच प्रमाणात चालु असुन तालुक्यात चार हजारा पैक्षा घरकुल आले आहेत. तेव्हा घरकुल धारक यांना १ लाख ते दिड लाख रुपयाचे घरकुल निधी असून त्यांना आपले घर व्यवस्थित बाधून घेण्यासाठी वाळू लागत असते तसेच भोकर नगर पंचायत अंतर्गत ही घरकुल बांधकाम चालू असून सामान्य घरकुल धारक यांना रेती कमी भावात मिळत नाही. त्या साठी अवैध रेती तस्कर बेभाव रेती विक्री करून सामान्य माणसांची महसूल विभागाला धरून लूट करीत असल्याचा उघड आरोप घरकुल धारक यांनी केला आहे. चांगली आणि दर्जेदार वाळू घेण्यासाठी अडीच ब्रास चे टिपर सुमारे अवैध रेतीचे भाव 24000 हजार ते 26000 हजार रुपये विकत घ्यावे लागत आहे. या तालुक्यात अवैध वाळू तस्करी करण्यासाठी नांदेड या मार्गे उमरी व मुदखेडओलंडून ह्या अवैध रेती तस्कर यांच्या गाड्या तालुक्यात व परिसरातील अनेक गावात बिनधास्त पणे येत असतात. तर अवैध रेती तस्कर आम्ही भोकर येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला धरून वाहतूक करत असल्याचे उघड बोलतात म्हणून महसूल प्रशासनाचा अवैध वाळू तस्कराचा आका कोण ? हा प्रश्न उपस्थित झाला असून भोकर तालुक्यासह ग्रामीण परिसरातील अनेक गावात सुमारे चार ते पाच हजार घरकुल धारक ,सामान्य घर बांधणारे नागरिक यांची उघड अवैध वाळू तस्करीची लूट होत आहे.