आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

मुंबई दि (प्रतिनिधी) सिंघम म्हणून ओळखले जाणारे आरे दुग्ध वसाहतीचे सुरक्षाधिकारी श्री विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला आहे.गोरेगाव दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरे चा कारभार चालू असतांना अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.यात प्रामुख्याने आरेचे सिंघम म्हणून ओळखले जानारे सुरक्षाधिकारी श्री विलास पवार यांच्या नेतृत्वात अनधिकृत कामावर सातत्याने हातोडा मारण्यात आला आहे.

काही दिवसाखालीच मयूर नगर येथील अनधिकृत वस्ती वर बुलडोजर चढवून त्यांनी सरकारच्या शेकडो एकर जागेचे रक्षण केले आहे, त्यांच्या विरोधात हजारो अतिक्रमण धारकांनी मोर्चा आंदोलने करून त्याच्या कर्तव्यावर आक्षेप घेण्यात आला.

असे कळते की, काही कार्यकर्ते व पत्रकारांणी तर त्यांच्या प्रामाणिकतेवर अविस्वास दाखवून नको ते आरोप करून त्यांच्या वरिष्ठाना त्यांच्या तक्रारी करून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते इमाने-एतबारे कर्तव्य करण्यास जराही डगमगले नाहीत.

नुकतीच त्यांनी मॉडर्न बेकरी समोरील गणेश नगर तर कीर्ती नगर येथील काही अनधिकृत झोपड्यांवर पुन्हा हातोडा मारला. यामुळे अनधिकृत झोपडी बांधकाम करणारे दलाल गुत्तेदार व मालकावर त्यांचा वचक निर्माण झाला आहे.

कोणत्याही अमिषाला किंवा कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या टीम सह विलास पवार यांनी चोख कर्तव्य बजावले आहे. प्रलोभने व वशिलेबाजी करून अनेकांनी अनधिकृत कामे करवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरेचा सिंघम विलास पवार कधीही आणी कुठेही झुकला नाही हे विशेष.

सामाजिक बांधिलकी आणी कायदा व सुव्यवस्था जोपासत पवार यांनी निडरपने आपले कर्तव्य बजावले असल्याचे कळते, काही सामाजिक संघटनानी सुरक्षा विभाग आणी त्यांच्या टीमच्या अतिक्रमण विरोधी धाडशी कामगिरीबद्दल
आरे च्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून अभिनंदन व कौतुक केले असल्याचे विस्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती वरून समजते.

Google Ad

Leave a Reply