गोपनीय माहितीच्या आधारे भोकर पोलिसांची मोठी कार्यवाही..

देशी दारूचा अवैध विक्री साठी जाणारा माल पकडला

भोकर:- (प्रतिनिधी)
भोकर शहरात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर पोलिस निरीक्षक यांच्या विविध पथकानं अनेक कार्यवाही करून अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री बंद केली असताना,तरी सुद्धा
भोकर शहरात पेट्रोलिंग करत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे एका पांढऱ्या रंगाच्या इंडिका विस्टा कार क्रमांक MH-21-V-5310 ची तपासणी केली वाहन चालक पवन लक्ष्मण कुरमोड,सुभाष चंद्रकांत वाघमारे रा.नेहरू नगर,भोकर येथील असून त्यांच्या गाडीची चौकशी केली असताना मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना आढळला ₹ 26,880/- किमतीच्या देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या ३८४ सीलबंद काचेच्या बाटल्या (प्रत्येकी ₹ ७०/-) ₹ 4,130/- किमतीच्या देशी भिंगरी संत्रा लेबल असलेल्या ९० मिली क्षमतेच्या ११८ सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या (प्रत्येकी ₹ ३५/-)₹ 3,800/- किमतीच्या रॉयल स्टॅग लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या २० बाटल्या (प्रत्येकी ₹ १९०/-)₹ 3,200/- किमतीच्या मेक डॉवेल नंबर वन लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या २० बाटल्या (प्रत्येकी ₹ १६०/-) ₹ 2,75,000/- किमतीची पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका विस्टा कार क्रमांक MH-21-V-5310
अशा प्रकारे एकूण ₹3,13,010/- किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे.पोलीस स्टेशन भोकर अंतर्गत मुख्य भोकर शहरांमध्ये आम्ही सोबत पोहवा/ 1173 सोनाजी कानगुले, पोहवा/3127 विष्णू खिलारे, पो.शि./ 2464 प्रमोद जोंधळे असे स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेले गोपनीय माहिती द्वारे पांढऱ्या रंगाची इंडिका कार विस्टा क्रमांक MH-21-V-5310 चे थांबवून पाहनी केली असताना वरील मुद्दे माल सापडला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन भोकर येथे गु.र. नं. 242/25 कलम 65(ई), 83 म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Google Ad