भोकरच्या ‘शाहूची’ उच्चांकी यशाची परंपरा कायम ..!

भोकर दि.13 मे .आज रोजी इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून नेहमीप्रमाणेच याही वर्षी ‘श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च मा.विद्यालय भोकरचा’ निकाल ९१.५९ % लागला असून सर्वोच्च निकालाची परंपरा कायम राखली आहे.

भोकर येथील श्री शाहू महाराज उच्च मा. विद्यालय हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाव असून सुरवातीपासूनच या विद्यालयात १००% कॉपीमुक्त अभियान राबवून परीक्षा घेतल्या जातात. यंदा ‘शाहू’चे ८५% च्या वर गुण घेणारे ३४ विद्यार्थी, तर विशेष प्राविण्यासह १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतून प्रथम मानकरी लक्ष्मीकांत विठ्ठलराव (९४.८०), द्वितीय कु.अक्कलवाड
श्रेया बालाजी (९४.४०), तृतीय मुनगे ज्ञानराज सुनील (९४.००), कु.चाटलवार श्रावणी किशोर (९३.६०), बाबळे इंद्रजीत बालाजी (९३.४०), सब्बनवार साईराम विठ्ठल (९३.४०), राठोड सुदर्शन शेषराव (९३.४०), जाधव सुरज बालाजी (९३.२०), सूर्यवंशी श्रद्धा बाळू (९३.००), मोरे वैष्णवी गोविंद (९२.८०), वाघे कृष्णकांत केशव (९२.६०), चिटकेशीवार अवनीश गजानन (९२.२०), जाधव तन्मय शंकर (९२.२०), देशपांडे अजिंक्य अमोल (९१.८०),घंटलवाड ओमकार मुकिंदा(९१.००),कु. जाधव वेदिका दत्ता (९१.००), कु.सूर्यवंशी अनुष्का मारोतराव (९०.६०),कु.राठोड अयोध्या अशोक(९०.६०), दर्शनवाड सुमित मारोती(९०.४०), कदम हर्षवर्धन गोविंदराव (९०.४०), भोसले श्रीशैल्य केरबा(९०.२०), जाधव जान्हवी प्रल्हाद (८९.६०), पांचाळ सृष्टी गोविंदराव (८९.६०)

विद्यार्थ्यांच्या या यशात विद्यार्थ्यांबरोबरच श्री शाहू महाराज उच्च विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच पालकांचा सिंहाचा वाटा आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. गोविंदरावजी पाटील लामकानीकर, सचिव शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, नूतन सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव श्री कैलासभाऊ देशमुख गोरठेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील कार्लेकर, सहसचिव श्री राजेश्वरराव वंगलवार, मु.अ. श्री संजय देशमुख कामनगावकर, उप.मु.अ.श्री. कैलास किनेवाड सर,श्री.गोडगे सर, श्री.चव्हाण सर , श्री. सलीम सर ,श्री. शिंदे सर , श्री. शेख सर ,श्री.काळवणे सर, श्री. सावते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Google Ad