मार्च २०२३ एस.एस.सी. परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला सोयगावचा ८२.९० टक्के निकाल…

Adiwasi kranti Marathi news portal
सोयगाव / विजय पगारे
————-
मार्च २०२३ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला सोयगावचे एकूण ११७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल ८२.९० टक्के इतका लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत भाग्यश्री सीताराम गवळी हिने ९०.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, यश विजय जाधव ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व अश्विनी रमेश गायकवाड हिने ८२.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल नावगिरे व प्रशालेचे मु. अ. दादाराव राठोड,एस. व्ही. पाटील, एस.एच.नवले, डी.एस.परदेशी , पंकज रगडे , अनिल ठाकूर, विद्याधर बागुल, संजीव जोशी, वैजीनाथ सावळे,अनिल मोरे, पठासर, श्रीमती वर्षा रामटेके श्रीमती जया वाघ , सुनिल शेटे ,प्रवीण चावले व अरुण जगदाळे यांनी अभिनंदन केले.