विदेशी नाही तर आपली सिंधी देशीच बरी…भोकर शहर व गावागावात देशी दारूचे अड्डे
भोकर तालुका प्रतिनिधी:भोकर तालुका लगतच्या राज्यातून देशी,विदेशी दारूची तस्करी करण्यात अडचण येत असल्यामुळे दारू विक्रेत्यांनी अड्डे बनविले असून मोठ्या प्रमाणात भोकर शहर व तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात अवैध देशी दारू सिंधी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत.याकडे पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.दरम्यान भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात मोटारसायकल व फोरव्हिलर वर देशी दारू तस्करी होत सर्रास दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहे.भोकर तालुक्यात प्रशासनाकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या.तरीही अवैध देशी दारूविक्री करीतच असुन भोकर शहर व तालुक्यातील अवैध देशी दारू व सिंधी कधी बंद होणार याकडे भोकर तालुक्यातील नागरिक बोलत आहेत.