भोकर तालुका ग्रामसेवक संघाच्या तालुका अध्यक्षपदी श्री नरेंद्र काळे तर सचिव पदी ज्ञानेश्वर कल्याणे यांची बिनविरोध निवड
भोकर दि. ११ (प्रतिनिधी)- दिनांक ९ ऑक्टोबर
रोजी पंचायत समिती भोकर येथील सभागृहात ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघाच्या बैठकीत भोकर तालुका ग्रामसेवकसंघाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र काळे यांची बिनविरोध निवड
करण्यात आली आहे या कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष
श्री संजय मिरजकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
होते जिल्हा सचिव पाटील उपाध्यक्ष श्री संतोष शिंदे
उपाध्यक्ष श्री संदीप गादेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत
हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला
या कार्यक्रमास भोकर तालुक्यातील कार्यरत ४२ गरम
ग्रामसेवकापैकी २७ जण उपस्थित होते राज्य अध्यक्ष
यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यकारणी
पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष ग्रामसेवक संघटना नरेंद्र
काळे सचिव श्री ज्ञानेश्वर कल्याणे उपाध्यक्ष देशट
वाड महिला उपाध्यक्ष अलका लिंगापुरे कोषाध्यक्ष
मुसळे व इतर सर्व पदावर निवड बिनविरोध करण्यात
आली प्रस्ताविक ग्रामसेवक मुसळे तर आभार शिंदे
आणि मानले निवड झालेल्या सर्वांचे राज्य उपाध्यक्ष
जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा उपाध्यक्ष गट विकास
अधिकारी केंद्रे नागापूरचे उपसरपंच तथा भोकर कृषी
उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालाजी पाटील
शानमवआड यांनी व मित्र मंडळ सर्व कार्यकारणीचे
अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.