ह.भ.प.नरसिंग महाराज केरुरकर यांना समाजभूषण पुरस्कार घोषित

भोकर (तालुका प्रतिनिधी) अध्यात्मिक व सामाजिक कार्यात आपला नेहमी सहभाग देणारे भागवताचार्य ह.भ.प. नरसिंग महाराज केरुरकर यांना विश्वकर्मा सेवा संघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
विश्वकर्मा समाजाच्या कार्यासाठी जिल्हाभर आपली सेवा देणारे अध्यात्मिक मार्गातून सामाजिक कार्य करीत समाजाला दिशा देणारे ह. भ. प. नरसिंग महाराज केरुरकर यांना विश्वकर्मा सेवा संघ नांदेड जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणारा 2024 चा समाजभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला असून 14 जुलै 2024 रोजी नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार वितरित केल्या जाणार आहे त्यांना पुरस्कार घोषित झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे

Google Ad