विशालगड ,गजापूर , येथील धार्मिक स्थळाची व घराची तोडफोड करून उपद्रव माजवणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणीचे सगळ्या पक्ष संघटनेच्या वतीने वेगवेगळे निवेदन देण्यात आले..
भोकर( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमणाच्या हटविण्याच्या मागणीसाठी आलेल्या उपद्रवी युवकांनी विशाल गडाच्या मार्गावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरावर व मस्जिदवर हल्ला करून तोडफोड केली मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराण हे शरीफ ची जाळफोक केली या सर्व प्रकरणाच्या निषेधार्थ आज भोकर येथे विविध पक्ष व संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून या सर्व दंगलीत सामील असलेल्या कठोर कारवाईकरांनी अशी मागणी करण्यात आली
दि 19 जुलै रोजी भोकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर काँग्रेस कमेटी, एम आय एम ,बीआरएस, आम आदमी पार्टी मुस्लिम लीग भिम टायगर सेना, युवा पॅंथर ,समाजवादी पार्टी,आदि पक्ष संघटनेच्या वतीने गजापूर येथील भ्याड सामील असलेल्या आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना भोकर तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आले.यावेळी बहुजन नेते नागनाथरावजी घिसेवाड,पत्रकार विजयकुमार मोरे पाटील.पत्रकार अहमदभाई करखेलीकर,बाबा खान, मिलिंद गायकवाड ,जुबेर मौलाना, सय्यद अलमास, तौसीफ इनामदार,आतीश सोनूले, आधी मनोगत व्यक्त करून या हल्ल्याबाबत तीव्र निषेध नोंदविला यावेळी सय्यद जुनेद पटेल खालेद मौलाना,रज्जाकसेठ प्रेसवाले,नईम तलेगावकर,अब्दूल हकिम भोकरकर,एजाज कुरेशी,करीम करखेलीकर,निजाम बाबा,मन्सूर पठान कोलगावकर,सय्यद जुनेद आशु भाई अफरोश पठाण आतिफ भाई गिरणीवाले शेख साबीर शफी इनामदार,इम्तियाज इनामदार ,प्रल्हाद सुकळेकर,युनूस लाला,अब्दुल नुफेद,अब्दुल सामी,सय्यद नासेर ,आमेर पटेल,अब्दूल अजिम,सय्यद जब्बार,सह आदि उपस्तिथ होते