डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या कार्याध्यक्षपदी डोईफोडे तर तालूका अध्यक्ष पदी करंदीकर यांची निवड..


भोकर(प्रतिनिधी)डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सखाराम वाघमारे यांच्या निवासस्थानी रविवारी बैठक घेण्यात आली होती.या बैठकित डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या नविन नियूक्त्या घोषीत करण्यात आल्या असून भोकर तालूका कार्याध्यक्ष पदी पत्रकार अरुण डोईफोडे यांची तर तालूका अध्यक्ष पदी गंगाधर करंदीकर यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रसिध्दी प्रमूख धसाडे सर संपादक उत्तम बाबळे के.वाय.देवकांबळे जिल्हाध्यक्ष सखाराम वाघमारे सचिव चंद्रकांत बाबळे मराठवाडा प्रमूख कवडीकर संजय बोथीकर चिदगीरी येथील सरपंच पवार आदिंची प्रमूख उपस्थिती होती.डाॅ.अण्णाभाऊ क्रांती सेनेची कार्यकारीणी पूढिल प्रमाणे निवडण्यात आली सचिव विठ्ठल डाकोरे उपाध्यक्ष अविनाश कराळे कोषाध्यक्ष राम बोयेवार तालूका यूवा अध्यक्ष मारोती कराळे सोशल मिडिया तालूका अध्यक्ष प्रल्हाद सूंकळेकर अंबादास बोयेवार आदिंची निवड करण्यात आली असून नवनियूक्त पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले व पूढिल कार्यास त्यांना शूभेच्छा देण्यात आल्या.

Google Ad