पाळज मध्ये जलजीवन मिशनची कामे अर्धवट स्थितीत उरकली
1कोटी 35 लाख रु.खर्च होऊनही ग्रामस्थांना पाणी मिळेना
भोकर (तालुका प्रतिनिधी )केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली मात्र अनेक ठिकाणी अर्धवट कामे असल्यामुळे स्वच्छ पाणी मात्र लोकांना मिळत नाही भोकर तालुक्यातील पाळज गावामध्ये जल जीवन मिशनचे काम अर्धवट स्थितीत करण्यात आले टाकीचे बांधकाम अर्धवट आहे गावात सगळीकडे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत नवीन नळ योजनेचे पाणी मात्र ग्रामस्थांना मिळत नाही अतिशय हलक्या दर्जाने काम उरकण्यात आले आहे.
भोकर तालुक्यातील पाळज ग्रामपंचायत येथे सर्वात मोठी असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मात्र कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिला आहे जल जीवन मिशन अंतर्गत पाळज गावासाठी 1कोटी 35 लाख रु.निधी मंजूर झाला 16 फेब्रुवारी 2023 ला तांत्रिक मान्यता मिळाली आणि सदर काम 25 फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्ण करावयाचे होते पाण्याची टाकीसाठी 17 लाख 13 हजार 212 रुपये वितरण नालिका पाईपलाईन साठी 40 लाख 83 हजार 463 रुपये चाचणीसाठी 78 हजार रुपये व ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून 13 लाख 75 हजार रुपये सदर योजनेसाठी खर्च करण्यात आले कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी झाला तरी काम अद्यापही अर्धवट स्थितीमध्येच आहे गावातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले मात्र नागरिकांना त्या रस्त्याचा पावसाळ्यामध्ये अतिशय त्रास सहन करावा लागला रस्त्याने नीट चालता देखील येत नव्हते जागोजाग खड्डे पडून पाणी साचले होते महिलांना देखील मोठा त्रास झाला पाईपलाईनची खोली कमी करण्यात आली हलक्या दर्जाचा पाईप वापरण्यात आला रोडच्या बाजूला एक फुटाच्या अंतरावरच नळाचे कनेक्शन देण्यात आले चार फूट लांबीवर पाईप टाकून कनेक्शन देणे गरजेचे होते मात्र तसे करण्यात आले नाही पाण्याची टाकी अर्धवट स्थितीमध्येच आहे सदर टाकीमध्ये पाणी मात्र अद्यापही साठवण झालेले नाही नवीन नळ योजनेचे पाणी ग्रामस्थांना अद्यापही मिळाले नाही हलक्या दर्जाच्या कामामुळे सदर योजनेचा लाभ ग्रामस्थांना अद्यापही मिळत नाही शुद्ध पाणी मात्र अद्यापही आलेले नाही जुन्याचं नळ योजनेचे पाणी चालू आहे अतिशय हलक्या दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत
सरपंच नामधारी उपसरपंच कारभारी..
भोकर तालुक्यातील पाळज ग्रामपंचायत सर्वात मोठी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी येत असतो कामाच्या दर्जा मात्र राहत नाही निधी खर्च केलेला दाखवण्यात येतो महिला सरपंच असल्याने उपसरपंच हेच येथील कारभार पाहतात महिला सरपंच केवळ नामधारी आहेत त्यांना काहीच माहिती दिल्या जात नाही यापूर्वी देखील महिला सरपंच होत्या त्यांच्या काळात देखील उपसरपंचांनी कारभार करून मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची कामे उरकून टाकून देयके उचलण्यात आली आहेत कामांचा दर्जा मात्र कुठेच राहिला नाही येथील कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे