मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांच्या उमेदवारीचा धोका !
संपूर्ण महाराष्ट्रात सभेचे वारे वाहू लागले तर 85 विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली विविध पक्षाच्या वतीने आपापल्या परीने कॉर्नर बैठका ग्रामीण भागातील जनतेच्या बैठका विविध अंगाने प्रचार जोर धरला असून भोकर विधानसभा मध्ये मात्र खरी लढत महाविकास आघाडी व महायुती या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये अटीतटीची लढत असून या अटीतटीच्या लढतीमध्ये भोकर विधान सभेचे बहुजन चेहरा असलेले गेल्या तीन विधानसभाचा दांडगा अनुभव घेऊन बहुजन नेते नागनाथ घीसेवाड यांनी लोकहित जनशक्ती पार्टी कडून लंगोट बांधून मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत प्रचार मोहिमेमध्ये सर्वसामान्य ओबीसी समाजाला सोबत घेऊन ग्रामीण भागातील सर्व खेडेपाडे भिजून काढत असल्याने मात्तबर राष्ट्रीय पक्ष्यांच्या उमेदवारांना धडकी भरल्याचे दिसून येत आहे या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतरही मनसे रासपा आणि अपक्ष उमेदवार उभे असल्याने चांगलाच रंग भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे पण येणाऱ्या काळात वीस तारखेला मतदान पेटीच्या रूपातून कोणता उमेदवार विजयी होईल हे सांगणे मात्र कठीण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे नागनाथ रावजी घिसेवाड यांचा जनसंपर्क व मतदारांशी घट्ट नाळ बांधलेली असल्याने यांच्या प्रचार मोहिमेच्या जादूची कांडी कोणावर फिरेल हे मात्र पाहण्यासारखे आहे मनोज पाटील जरांगे यांचा आदेश मराठा बांधवांना कुणाला पडायचे ते पाडा हा महामंत्र सुद्धा कुणाची वाट लावेल हे तेवढेच औत्सुक्याचे आहे? अशातच भोकर शहरात बहुजन नेते नागनाथ रावजी घीसेवाड यांच्या प्रचारार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेने भोकर तालुक्यातील संपूर्ण ओबीसी जनता एक वटली तर उत्तर विधानसभेचा निकाल काहीतरी वेगळाच लागण्याची दाट शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे या विविध प्रकारच्या प्रचार मोहिमेमध्ये त्या पक्षाची बाजू भक्कम राहील ते सध्या तरी सांगणे कठीण आहे !एकंदरीतच नागनाथ रावजी घीसेवाड यांच्या गनिमी काव्याच्या प्रचार मोहिमेकडे संपूर्ण भोकर तालुक्याचे लक्ष बारकाईने लागून आहे!
मुस्लिम समाजाचे व मागासवर्गीय समाजांचे जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडी व ओबीसी नेते नागनाथ रावजी घिसेवाड यांच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता असल्याचे मतदारसंघांमध्ये चर्चा ऐकण्यात येत आहे असे जर झाल्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा राज्यसभा खासदार यांच्या कन्येला फटका बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही?