जागतिक एड्स दिनानिमित्त भोकर शहरात रॅली काढून केली जनजागृती

भोकर :- ” जागतिक एड्स दिन ” निमित्त भोकर शहरात ग्रामीण रुग्णालय आणि राम रतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार सकाळी ९ वाजता च्या दरम्यान भोकर शहरात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय आणि शिवाजी चौक इथपर्यंत जाऊन ही रॅली पुन्हा त्याच मार्गाने परत येऊन नर्सिंग कॉलेजमध्ये विसर्जित झाली.

यावेळी शाळेतील असंख्य विद्यार्थी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते यात आयसीटीसी विभाग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रिनंदन पांचाळ, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, कु जागृती जोगदंड, सुरेश डुमलवाड, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, अनिल गवळी, जाहेद अली, सैफ अली, मारोती कठारे, वाहन शेख सोहेल , राम रतन नर्सिंग कॉलेजचे मंगेश सर व विद्यार्थ्यीनी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

Google Ad