भारतीय प्रजासत्ताक दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा..

भोकर :- आज दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय ७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण व डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते राष्ट्र पुरुष, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून, पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. डॉ प्रताप चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत द्वारे सलामी देण्यात आली.
भारतीय संविधान मधील उद्देशिका (सरनामा)/Preamble याचे सामूहिक वाचन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी केले.
भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्य घटनेतील मुलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मुलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे मॅडम यांनी “तंबाखू मुक्तीची ” सामूहिक प्रतिज्ञा वाचन केले. तसेच ” कुष्ठरोग मुक्तीचे ” प्रतिज्ञा वाचन संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक यांनी केले.
यावेळी डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, हत्तीरोग कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.