भोकर येथे सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी,देशात शांतता सुख समृद्धी साठी केली प्रार्थना

इस्लामिक कॅलेंडर नुसार रमजान हा नववा महिना आहे, हा महिना अंत्यत पवित्र माणला जातो या महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवासाचा महिना म्हणून पाळतात,शेवटी चद्रदर्शना नंतर शव्वाल च्या पहिल्या तारखेला समस्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली जाते भोकर शहर व तालुक्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी.भोकरचे तहसिलदार विनोद गुंडमवार पोलिस निरीक्षक अजित कुंभार, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील
रावणगावकर ,भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर, राष्ट्रवादीचे भोकर तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, भाजपा भोकर तालुका समन्वयक भगवानरावजी दंडवे ,भाजपा भोकर तालुका अध्यक्ष गणेश पाटील कापसे बटाळकर, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख ,प्रमोद देशमुख कामणगावकर ,मा.नगरसेवक सुभाष पाटील गौड,मा.उपसभापती सुरेश बिल्लेवाड,प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुका अध्य्क्ष अॅड शेखर कुंटे, परशु पाटील डौरकर अॅड शिवाजी कदम,जेष्ठ पत्रकार एल ए हिरे,संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार अनिल डोईफोडे ,निळकंठ वर्षैवार,अप्पाराव राठोड,श्रीकांत पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष गजु पाटील सोळंके, वाय देवकांबळे,सहित आदि राजकीय सामाजिक प्रतिष्ठित नागरिकांनी इदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या ईद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार तसेच अप्पर पोलिस अधिक्षक डाॅ खंडेराय धरने ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित कुंभार सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलेद्र औटे,कल्पना राठोड पोलिस उपनिरीक्षक सुरेश जाधव ,राम कराड, प्रल्हाद बाचेवाड ,गोपनिय शाखेचे परमेश्वर गाडेकर ,गुरूदास आरेदार यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
………चौकटित घेणे…….
स्व .परमेश्वर पाटील चिंचाळकर हे त्यांच्या निवासस्थानासमोर दरवर्षी रमजान ईद व ईद-उल अज्हा निमित्त नमाज साठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना वजू करण्यासाठी पाण्याची सोय करत होते कोरोना काळात त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली हे कार्य त्यांचे चिरंजीव साईप्रसाद पाटील ढवळे,व नकूल पाटील ढवळे यांनी सुरू ठेवले असून दिनांक 31 मार्च रोजी ईद निमित्त ईदगाह येथे नमाज साठी आलेल्या मुस्लिम बांधवांसाठी त्यांच्या निवासस्थानासमोर वजूसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.