नूतन वर्षाच्या संकल्पांना ‘राष्ट्रवादी’ भरारी; अजितदादांच्या हस्ते ओबीसी विभाग दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन!..
नूतन वर्षाच्या स्वागतासोबतच समाजकार्याचा संकल्प दृढ करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग, सांगली जिल्हा (ग्रामीण) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘नूतन वर्ष २०२६’ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात दिमाखात संपन्न झाला.
पुणे येथील ‘जिजाई’ या निवासस्थानी झालेल्या या विशेष कार्यक्रमात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि खासदार सौ. सुनेत्राताई पवार (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते या देखण्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. नेत्यांच्या मार्गदर्शनाचा वारसा ही दिनदर्शिका म्हणजे केवळ तारखांचा संग्रह नसून, ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. कल्याणराव आखाडे, माजी मंत्री मा. अजितरावजी घोरपडे सरकार, सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. निशिकांत दादा पाटील आणि युवा नेतृत्व राजवर्धन घोरपडे सरकार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ही दिनदर्शिका साकारण्यात आली आहे. सोहळ्याची शोभा वाढवणारे मान्यवर*
या प्रकाशन प्रसंगी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजयभाऊ कोळी, जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे आणि जिल्हा उपाध्यक्ष बसवेश्वर जमखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभर राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम आणि ओबीसी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. अजितदादांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, सांगली जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’च्या कार्याला या निमित्ताने नवी झळाळी मिळाली आहे.
*
