दर्पण दिनाचे औचित्य साधून भोकर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक कुंभार साहेब यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

भोकर – दि. ६ जानेवारी रोजी दर्पण दिना चे औचित्य साधुन भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भोकर येथील उद्योजक तथा संचालक इंजि. विश्वांभर पवार व भोकर पोलीस प्रशासन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्यावतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या भोकर येथील पत्रकार बांधवाचा गुलाब पुष्प, लेखणी, डायरी देऊन सन्मान करण्यात आला. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे पवित्र कार्य हे पत्रकार बांधव करतो व शासन – प्रशासन यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करतो तेंव्हा त्यांचा सन्मान व्हावा व संवाद व्हावा म्हणून भोकर येथे दि. ८ जानेवारी रोजी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी भोकर शहरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते