भोकर पोलिसांची मोठी कारवाईत: ३४ चोरीच्या दुचाकींसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
भोकर:- (आदिवासी क्रांती मराठी न्युज)नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत भोकर पोलिसांनी मोठी यशस्विता संपादन केली आहे. पोलिसांनी आंतरराज्यीय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २३,०५,००० रुपये किमतीच्या एकूण ३४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.सोनारी येथील शेतकरी गजानन होनशेटे यांची दुचाकी ३० डिसेंबर २०२५ रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. ५ जानेवारी २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, भैंसा-भोकर रोडवर सापळा रचून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
१) नवीन उर्फ मामू नारायण गुदेवार (वय ३३, रा. दिवशी बु. ता. भोकर)
२) भीमराव उर्फ बाळू किशनराव कदम (वय २६, रा. दिवशी बु. ता. भोकर)
३) किरण दारासिंग कदम (वय २१, रा. दिवशी बु. ता. भोकर) २३.०५ लाख रुपये किमतीच्या ३४ दुचाकी मिळाले असून
कारवाईमुळे भोकरसह तेलंगणा राज्यातील कामारेड्डी, निजामाबाद, बासर, नवीपेठ आणि डिचपल्ली येथील एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.उर्वरित २१ दुचाकींच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकावरून त्यांचे मालक व गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, राम कराड आणि अंमलदार गुरुदास आरेवार, विवेकानंद गिरी, सुदर्शन एकुलवार, संजय माळकोटे, राम टेकाळे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.
