जसखार येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.

उरण दि ६ (विट्ठल ममताबादे )गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे. रक्ता अभावी कोणाचे जीव जावू नये. या अनुषंगाने दरवर्षी स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्व.श्री. गुलाबभाई म्हात्रे मित्र मंडळ जसखार यांच्या तर्फे गरजूंना जीवनदान देण्याच्या उद्देशाने दरवर्षी जसखार येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. यंदा स्व. श्री गुलाबभाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रविवार दि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रक्तदान शिबीर,मोफत आरोग्य तपासणी शिबीर व डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजू व्यक्तींनी या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर व डोळे तपासणी शिबीराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केतन म्हात्रे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी केतन म्हात्रे फोन नंबर – ९८७०९८४५४४ यांच्याशी संपर्क साधावे.
This web page can be a stroll-by way of for the entire information you wanted about this and didn’t know who to ask. Glimpse right here, and you’ll undoubtedly discover it.