भोकर येथे ०१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

भोकर प्रतिनिधी:- दि.०१जानेवारी २०२५ रोज बुधवारी वंचित बहुजन आघाडी शाखा भोकरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भोकर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राव यांनी केले आहे.
दि.०१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावच्या रणांगणावर ५०० शूर महार सैनिकांनी अतुलनीय साहस आणि अतुलनीय शौर्य गाजवून २८ हजार सैन्यांवर ऐतिहासिक विजय मिळविला.त्या ऐतिहासिक आणि अस्मिता प्रधान लढाईतील आपल्या शूरवीरांनी घडविलेला पराक्रम,त्यांचा निसिम त्याग आणि बलिदानाची प्रेरणा येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणादायी ठरावी यासाठी वंचित बहुजन आघाडी शाखा भोकरच्या वतीने २०७ वा भीमा कोरेगाव शोर्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तेलंगणा राज्यातील समाजसेवक एम.सायलू म्हैसेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालीमकर,तहसीलदार विनोद गुंडमवार, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण,पोलीस निरीक्षक अजित कुंभार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवाण, बहुजन नेते नागनाथ घिसेवाड,माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,ओबीसी नेते नामदेव आयलवाड,डॉ.उत्तम जाधव,डॉ.साईनाथ वाघमारे,डॉ. विजयकुमार दंडे,ॲड.सिद्धार्थ कदम,ॲड.खाडे,ॲड.राहुल कदम,भीमराव दुधारे,ॲड.बी.ए.कावळे,गृहपाल सुमित्रा साळुंके,प्रा.जे टी जाधव,प्रा.प्रशांत सावते, पत्रकार सुधांशु कांबळे,प्रा सुमेध हानवते, गणेश नांगरे,एस.एम.धोत्रे,विकास क्षीरसागर, बालाजी आंबोरे,गौतम कसबे,देवा हाटकर आदी मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष साहेबराव मोरे यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात सकाळी ०९ वाजता पंचशील ध्वजारोहण केले जाणार आहे. यानंतर विविध मान्यवरांचे समयोचीत भाषणे होणार आहेत तर दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीमशाहीर आनंद कीर्तने नांदेड व भीम कन्या शालिनीताई गवळी मुंबई यांचा भीम गीतांचा प्रबोधन पर सामना होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख दिलीप केरबाजी राव यांनी केले आहे.

Google Ad