भोकर विधानसभा मतदारसंघ त १४०पैकी २५उमेदवार रिंगणात

भोकर विधानसभा मतदारसंघ कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातून एकून १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहीले होते. परंतु फॉर्म उचलून घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ११५ उमेदवारांनी आपापली उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ २५ उमेदवार राहिले असून या मतदारसंघात मुख्य लढत भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण, काँग्रेसचे उमेदवार तिरुपती (पप्पू )पाटील कोंढेकर,तिसऱ्या आघाडीचे उमेदवार नागनाथराव घिसेवाड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे.
नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची ४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्याने या दिवशी चर्चेचा विषय ठरलेले, प्रहार मध्ये अचानक प्रवेश केलेले नामदेवराव आयलवाड, माजी आमदार अमिता अशोकराव चव्हाण, इंजि.विश्वंभर पवार,दत्तात्रय अनंतवार अश्या प्रमुख उमेदवारासह १११ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी माघार घेतली त्यामुळे आता भोकर विधानसभेतील निवडणूकीच्या रिंगणात फक्त २५ उमेदवार उभे राहिले असून यांच्यात प्रामुख्याने चौरंगी, लढत होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उमेदवारी अर्ज भोकर विधानसभा मतदारसंघात भरले होते. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात या मतदारसंघाची वेगळीच चर्चा रंगली होती.परंतु उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या वाटाघाटी संपन्न होऊन आता केवळ २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेसचे पप्पू पाटील कोंडेकर,भाजपच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे श्रीजया चव्हाण,तिसऱ्या आघाडीचे नागनाथराव घिसेवाड,वंचित बहुजन आघाडीचे सुरेश राठोड, आदी प्रमुख उमेदवार रिंगणात राहिले असल्याने या मतदार संघात चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून शेवटी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या २३ नोव्हेंबर रोजीच पहावयास मिळणार आहे.