रयतेच्या राजाचे विचार डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा एक बहुजन योद्धा-नागनाथ घीसेवाड

85 विधानसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून भोकर विधानसभा मध्ये मा. मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण या महायुतीकडून उभे आहेत तर महाविकास आघाडी पप्पू पाटील कोंडेकर विधानसभेला तर लोकसभेला दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे उभे आहेत,वंचित बहुजन आघाडी कडून सुरेश राठोड तर जनहित लोकशाही पार्टी कडून नागनाथ घीसेवाड यांनी दंड थोपटून मैदान गाजवत आहेत! गेल्या तीन विधनसभेच्या विधानसभेचा अनुभवाच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन जनतेच्या विकासासाठी दिवस-रात्र धडपडत असणाऱ्या नागनाथ घिसेवाड यांनी प्रस्थापित धनशक्तीच्या विरोधात उमेदवारी माघार न घेता केवळ जनतेच्या प्रेमापोटी जीवाचं रान करुन मातब्बराच्या विरोधात लंगोट बांधून तयार झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे! एकीकडे अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 115 जणांनी आर्थिक उलाढाल करून माघार घेतल्याची चर्चा असून त्याच दिवशी नागनाथ घिसेवाड यांना अर्ज माघार घेण्यासाठी प्रस्थापितांकडून अनेक फोन कॉल धमक्या देऊन शोधण्याचा प्रयत्न झाल्याची ही चर्चा आहे पण शेवटी नागनाथ घिसेवाड यांनी कुठल्याही धमक्यांना भीक न घालता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून सर्वसामान्य बहुजन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भोकर विधानसभा मध्ये कॉर्नर बैठका घेऊन मतदार संघ पिंजुन काढताना जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असल्याने प्रस्थापितांना धडकी भरल्याचे बोलल्या जात आहे या विधानसभेच्या निवडणुकीत नागनाथ घीसेवाड यांची उमेदवारी निर्णायक ठरणार! सरते शेवटी काय करिष्मा करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे रडणारा नव्हे तर हा लढणारा वाघ भूमिपुत्र नागनाथ घीसेवाड यांनी काय करिष्मा करतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे अशी मतदारसंघात चर्चा ऐकवायला मिळत आहे