राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी-प्रा.मोतीलाल सोनवणे.


न्याहाळोद ता.जि.धुळे रविवार येथे दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आणि समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती गणेश धोबी यांच्या नेतृत्वात उत्साहात साजरा करण्यात आली.संत गाडगेबाबा यांच्या जन्म धोबी समाजात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला होता. लहानपणीच वडिलांचे निधन झाले.मामांनी त्यांच्या पालन पोषण केले.लहानपणापासून अध्यात्म समाजसेवेची आवड होती म्हणून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमाने अंधश्रद्धा,अस्वच्छता याबाबत जनजागृतीचे काम केले.
संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमाने मार्गदर्शन करत असत की,देव दगडात नाही तर माणसात आहे.जनावर जनावरासारखे वागतात मग माणसं माणसासाठी का वागत नाही? धर्माच्या नावाखाली कोंबड्या, बकऱ्यासारखे मुक्या प्राण्यांना बळी देऊ नका.माणसाचे खरोखर कोणी देव असतील तर ते आईबाप आहेत.दान घेण्यासाठी हात पसरू नका,दान देण्यासाठी पसरा.अडाणी राहू नका.मुला बाळांना शाळा शिकवा.दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालू नका.भुकेल्यांना अन्न द्या.तहानलेल्यांना पाणी द्या.उघड्या नागड्यांना कपडे द्या.गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करा. अंध,अपंग,रोगी यांना औषध द्या. बेरोजगारांना रोजगार द्या.गरीब तरुण-तरुणींचे लग्न मोडण्याचे पाप करू नका.लग्न जोडण्याचे पुण्य करा.
या कार्यक्रमाला गणेश धोबी, राजाराम धोबी, अधिकराव धोबी, रोहित धोबी,रवींद्र धोबी,सुनील धोबी,राहुल धोबी,मोहन धोबी, भूषण धोबी,शिव धोबी,शोभाबाई धोबी,शाहबाजखान पठाण,आबा चौधरी,सचिन बुवा,रऊप पठाण,विजय अमृतकर,रहीम शेख,बशीर पठाण,साद पठाण,आबा अमृतकर,रिजवान पठाण,विकार शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad