सोयगाव :महालब्धा येथील शेतकरी कुटुंबातील दांपत्य पती पत्नी ची आत्महत्या की हत्या …?

संदिप आळेकर मयताच्या खिशात मिळुन आलेल्या चिठ्ठीच्या दिशेने पोलीस तपास सुरू …!
——————————–
सोयगाव प्रतिनिधी
विजय पगारे
°°°°°°°°°
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत औट पोलीस चौकी सावळदबारा अंतर्गत महालब्धा गावातील ठोक्यावर शेती कसत असलेला विवाहित
तरुण संदिप शालीकराम आळेकर वय ३२, पत्नी लता संदिप आळेकर वय २८हे दोघे पती पत्नी बुधवारी शेतातून उशीरा पर्यंत घरी परतले नसल्याने संदिप चे शेतकरी पिता शालीकराम गणपत आळेकर शोध घेण्याकामी गेले असता
शेतातील मचानवर संदिप आळेकर याने आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर सुन लता आळेकर ही मचान वर असलेल्या खाटेवर विष प्राशन केलेल्या आवस्तेत आढळून मिळून आली.फर्दापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देताच नोंद घेण्यात आली लागलीच सहाय्यक पोलीस निरिक्षक
भारत मोरे.पो.ना.निलेश लोखंडे.मिरखा तडवी. यांच्या सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, घटनास्थळ पंचनामा करून मयतांचा सावळदबारा येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर पोलिसां च्या उपस्थित अंतविधी करण्यात आला आहे.गट नंबर ८९/८२ घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात मयत संदिप आळेकर यांच्या खिशात पोलीसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यात नमुद दोघ संशयीतांना पोलीसांनी पुढील तपासासाठी तांब्यात घेतले आहे.
——–
कोट :
मयतांच्या नावे शेती नाही, दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती पती पत्नी करित होते,पिता शालीकराम गणपत आळेकर यांचे नावे अल्पशेती असुन शेतकऱ्यांचे शेतकरी पुत्र व सुन मयत अवस्थेत मिळून आले आहेत.तपासात दोन सशयीतांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले असून मयत संदिप आळेकर यांच्या खिशात लिहिलेली चिठ्ठी सापडली असुन हस्तरेषा तज्ञा कडून चीठ्ठी त्यानेच लिहिले आहे का ? पती पत्नी ने आत्महत्या केली किंव्हा त्यांचा घातपात झाला, त्या मागील काय कारण काय याची उकल करण्यात येणार आहे.

भरत मोरे
सहाय्यक पोलीस निरिक्षक
——–
बाॅक्स :
राहुल सोनवणे, गणेश शेळके दोन इसमांना चौकशी कामी फर्दापूर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणात गणेश शेळके मुख्यत्वे दोषी असल्याचे राहुल सोनवणे यांचे पित्याने गुरूवारी (ता.२३) व नातेवाईकांनी गुरवारी सांगीतले…
—————
फोटो ओळ :
मयत संदिप मयत लता आळेकर

Google Ad