हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस भोकर येथे विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या आयोजनाने उत्साहात साजरा..

Adiwasi kranti Marathi song
महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष,
हिंदू जननायक सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 14 जून 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भोकर शहरात परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे श्रीमद्भगवद्गीता या धर्मग्रंथाचे व हनुमान चालीसा च्या प्रतींचे वाटप करण्यात आले…. श्रीमद्भगवद्गीतेची महती सर्व हिंदू बांधवांना कळाली पाहिजे व हिंदू धर्मग्रंथ घराघरात पोहोचला पाहिजे या उद्देशाने सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मोंटीसिंग दादा जहागिरदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदरच्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भोकर तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार, शहराध्यक्ष आकाश गेंटेवार व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने चे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या कडून करण्यात आले. ह्या वेळी शंकर पाटील हाडोळीकर, राहुल शिंदे, अविनाश वैष्णव,सुनील पवार, राहुल बुद्धेवाड, बालाजी गोरगे, गोविंद आगलावे, अशोक नीळकंठे, राजू कवडे, ओमप्रसाद अन्नरवाड, गजानन जाधव, विकास वानखेडे, मारोती जंगमवाड, लक्ष्मीकांत शिरमोड, आदित्य हामंद, साईप्रसाद राहुलवाड, शिवानंद पिल्लेवाड, तुकाराम मुकेवाड, योगेश चार्लेवाड, व्यंकटेश खंडागळे यांच्या सह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक व नागरिक उपस्थित होते.

Google Ad