आगरी समाजाची सृष्टी राजू मुंबईकर जि शिप गुणवत्ते मध्ये अव्वल.आगरी समाजातील पहिलीच मुलगी जि शिप गुणवत्ता मध्ये अव्वल.
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्याचे सुपुत्र राजु मुंबईकर म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ते. खरतर उपेक्षित आदिवाशीबांधवांसाठी लढणारा एक लढवैय्या ! राजु मुंबईकर म्हटल कि प्राणिमात्रांवर प्रेम करणारा निसर्गमित्र एक प्रख्यात सर्पमित्र .शेकडोच्या संख्येने कॉलेज शाळा सामाजिक मंडळाना साप समज आणि गैरसमज या व्याख्यानातून समाजाला जे जे दिसे भुत ते ते मानी भगवंत हि शिकवण आचरणात आणनारा आणि समाजाला प्रवृत्त करणारा एक परीस.पण आज त्यांच्या छोट्या कन्या सृष्टी मुंबईकर यांनी उत्तम यश मिळवत ध्येयाकडे वाटचाल सुरु केली आहे. आगरी समाज हा तसा प्रेमळ आणि लढवैय्या आहे.
समूद्र आणि डोंगऱात बिंधास्तपणे भ्रमण करणारा एक संवेदनशिल माणूस.मग बरिच मुल शिक्षणानंतर डॉक्टर इंजिनिअरिंग आयटी असे करीयर साठी प्राधान्याने निवडतात.पण कुमारी श्रुष्टी राजेंद्र मुबंईकर हिने टीएस रहमान नव्हा इथे प्रवेश घेउन १२ वित ६९% मार्क मिळवत दळणवळणाच्या जहाजावर तिच्या कॉलेजतर्फे निवड झाली.
आणि अभिमानाची बाब अशी कि भारतदेशांतून विवीध कॉलेज मधून ४३ मुली निवडल्या गेल्या त्यात अंतिम निवडीत फक्त १५ जणीची निवड झाली. आणि त्यात आगरी समाजाची पहिली मुलगी जि शिप( GP )गुणवत्तेमधे अव्वल ठरून तिची निवड झाली. समुद्र हा आपला सखा शेजारी सुख दु:खाचा पाठिराखा ! मात्र आपण आपल्या पांल्याना ह्या क्षेत्रात टाकत नाही हि एक व्यथा म्हटल तर वावग ठरणार नाही.ति सहा महिन्यांसाठी व्हेसलवर रहाणार आहे. मग तिला अनेक देश पहावयास मिळतील. निळा समुद्र निळ आभाळ तिच्या स्वागतासाठी सज्ज झालय. ह्यात भविष्य उज्वल करण्याच्या खुप संधी आहेत श्रुष्टी पुढिल परिक्षा देउन त्या जहाजाची कप्तानही बनू शकते.आपण हि आपल्या मुलाना ह्या क्षेत्रात टाकून उज्वल भविष्य घडऊ शकता.मात्र खऱ्या अर्थाने हा तस पाहिल तर धाडसी निर्णय ज्या मातापित्याने घेतला ते श्री राजू मुंबईकर आणि सौ. मुंबईकर ह्या खऱ्या अर्थाने कौतूकास पात्र आहेत.त्यांचे राजूदादा मित्रपरीवार आणि सकळ आगरी समाज्याच्या वतीने अगदी मनापासून कौतूक करण्यात आले आहे.भविष्यात कुणाला जर ह्या कॉलेजविषयी तेथील शिक्षण व करियरगायिडन विषयी मार्गदर्शन लागले तर राजू मुंबईकरांना नक्की संपर्क करा. असे आवाहन करण्यात आले आहे.