भोकर पोलिससाची सिंगम कारवाई:भोकर पोलीसानी 50 किलो गांजा पकडला

तेलंगणा मधून भोकर मार्गे नांदेड कडे जाणाऱ्या छोट्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पो मधून छुप्या मार्गाने वाहतूक होत असलेला गांजा भोकर पोलिसांनी आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बायपास रोडवर पकडून दोघांना अटक केली आहे. पकडलेल्या गांजाचे वजन 50 किलोच्या वर असल्याचे कळते.
याबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी महिंद्रा टेम्पो क्रमांक टी एस 36 टी 4202 हा भोकर मार्गे नांदेडला जात असून यामध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक श्री नानासाहेब उबाळे यांना कळताच त्यांनी सापळा रचला आणि सापळ्याच्या आधारे रोडवर महिंद्रा टेम्पो यास पकडले असता त्यामध्ये मक्याच्या कंसाच्या पोत्याच्या खाली एका पोत्यामध्ये गांजा भरलेला दिसून आला, त्यावरून त्यांनी सदरील टेम्पो ताब्यात घेऊन भोकर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले आरोपी चालक शेख करीम शेख खादर आणी शेख रहीम शेख मीरामोहिद्दीन दोघे राहणार निजामाबाद यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री नऊ पर्यंत चालू होती

Google Ad