भोकर विधानसभेतील उभरत नेतृत्व म्हणजे इंजि. विश्वाभंर पवार यांचा प्रवास…
जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आजावर अनेक पदाला गवसनी घालून विजयी अगकूचं अखंड सुरूच आहे तर राजकारणितील एक नवखा परंतु चाणाक्ष समाजकारणी म्हूणुन सध्या ज्याकडे पाहिलं जात आहे ते म्हणजे इंजि. पवार.स्वतःची तत्वे असणारी आणि तत्वांशी प्रामाणिक असणारी माणसे या जगात कमीच असतात. दिवसेंदिवस अशा माणसांची वानवा सर्व क्षेत्रात जाणवते आहे. वीस टक्के राजकारण व ऐंसी टक्के समाजकारण हे राजकारणातील तत्व केव्हाच मागे पडलं.
अशाही काळात काही माणसं तत्वांवर विश्वास ठेवून राजकारणात एक एक पायरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातील एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.इंजी. विश्वांभर पवार.
नांदेड जिल्ह्यातील एक उभरतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आशेने पाहिलं जात आहे. अल्पावधीतच संबंध नांदेड जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. युवकांचा, वंचितांचा, शोषितांचाआवाज बनून राजकारणात, समाजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
इंजि.विश्वांभर पवार यांचा जन्म ३/१/१९८४
रोजी भोकर जिल्हा नांदेड येथे झाला. वडील भुविकास बॅकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. आई गृहिणी. दोन भाऊ, एक बहिण सर्वांचे शिक्षण अभियांत्रिकीच्या शाखांमधून झालेलं. विश्वांभर पवार यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भोकर येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.
मा. कुरे साहेब, आर्किटेक्चर नांदेड यांच्या कडे सिव्हिल इंजिनिअर म्हणून कामास सुरुवात केली. भाऊराव चव्हाण स. साखर कारखाना, जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना, आष्टी येथे काही काळ काम केले.
हिमायतनगर येथील तहसील कार्यालय बांधकाम, कंधार येथील सार्वजनिक बांधकाम व कार्यालय बांधकाम , यवतमाळ येथील शासकीय आरोग्य विभागाची इमारत बांधकाम,अशा विविध ठिकाणी कामे करत करत अनेक खाजगी कामेही केली.
ओम साई असोसिएटस भोकर व नांदेड च्या माध्यमातून घरांचे बांधकाम नकाशा तयार करणे, इस्टीमेट तयार करणे, प्लॅनींग अशी कामे करत करत अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
मराठवाडा जनता विकास परिषदेचे सदस्य,
छावा संघटनेचे जिल्हा संघटक, पाणी फाउंडेशनचे भोकर या. समन्वयक म्हणून सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग नोंदविला.
राजकीय क्षेत्रात काम करण्याचा वसा घरातूनच आजोबा श्री. नागोराव पाटील रोशनगावकर यांच्याकडून मिळाला.
समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा, जिद्द मनात बाळगून मागील पंधरा वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने सातत्याने रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित करून समाजात आरोग्य प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः सलग सोळा वेळेस रक्तदान करून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आधार दिला.
दिव्यांग शिबीर आयोजित करून त्यांना साहित्य वाटप केले. वृध्दाश्रमास आवश्यक साहित्य वाटप करून ज्येष्ठांना आधार दिला.
शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलाचा सन्मान, पुरस्कार, पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा गेले अनेक वर्षांपासून करत आहेत. एकंदरीत समाजातील प्रत्येक घटका पर्यंत काहींना काही कस देता येईल हेच प्रामाणिक प्रयत्न.
तीन पिढ्यांपासून काॅग्रेस पक्षात सक्रिय सहभाग नोंदविला. परंतु सातत्याने डावललं जातं असल्याने पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर मोठ्या मताधिक्याने निवड झाली.
मा.अजित दादा पवार साहेब यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवलं.
जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.नुकतीच जिल्हा नियोजन व विकास समितीवर ही काम करण्याची संधी दादांच्या माध्यमातून प्राप्त झाल्याने अजून कमास गती व गर्दी वाढणार यात शंकाच नाही.पुढील काळात आमदार, खासदार, मंत्री आणि यापेक्षाही मोठ्या पदावर काम करण्याची संधी आपणास नक्कीच मिळेल.तुमच्या नवनवीन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा