भोकर तालुक्यातील जेष्ठ बाबुराव पाटील यांना पत्रकारीता पूरस्कार जाहिर.

भोकर (प्रतिनिधी)
येथील सकाळ चे ज्येष्ठ बातमीदार बाबुराव पाटील यांना कंधार येथील (कै.) दूर्गादास सराफ प्रतिष्ठान व हिंदवी बाणा परिवार चा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मागील तीस वर्षांपासून बाबुराव पाटील वृतपत्र क्षेत्रात काम करीत असून विविध विधायक बातम्याना प्राधान्य देवून उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली लेखनी झिजवली. याची दखल घेवून यापूर्वी राज्य, मराठवाडा, जिल्हा, तालुका स्तरावर पूरस्कार मिळाले आहेत.केवळ पत्रकारीताच नव्हे तर चित्रकार,नाट्य ,तबला वादक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.कंधार येथील कै.दूर्गादास सराफा प्रतिष्ठान व हिंदवी बाणा परिवाराकडून पत्रकारांचा गौरव व्हावा म्हणून मागील सहा वर्षांपासून पुरस्काराचे नियोजन केले जात आहे.यंदा हि सोमवारी ता. (एक) पूरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात श्री.पाटिल यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.लवकरच एका विशेष कार्यक्रमात मान्यवराच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Google Ad