अधिकाऱ्यांच्या हप्ते खोरीमुळे भोकर तालुक्यात अवैद्य दारूची नशा…
उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
भोकर ( प्रतिनिधी ) २०२४ ची लोकसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर झाली आहे यामुळे राजकीय पक्षा बरोबर महसूल व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हप्ते खोरीमुळे तालुक्या मध्ये खेडोपाड्यापासून राष्ट्रीय महामार्ग ते राज्य मार्ग व ग्रामीण मार्ग ते गल्लीबोळ्यातील टपऱ्यांवर खुलेआमपणे दारू विक्रीचे धंदे जोमाने चालू आहेत ज्या ठिकाणी रेस्टॉरंट म्हणून आहेत अशा ठिकाणी देखील हॉटेल बाहेरील बगीच्या मध्ये मद्य प्राशन करण्यास मुभा दिली जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून नाक्या नाक्यावर वाहनांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे तरी देखील ग्रामीण भागात आणि विविध ठिकाणी खुलेआम पणे अवैद्द दारू विक्री होत आहे राजरोजपणे दारू विक्री करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील धाबे व रेस्टॉरंट यांच्यावर खुलेआमपणे दारू विक्री केली जात आहे त्याचबरोबर राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ते ग्रामीण भागात चायनीज सेंटरवर, स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिण्याचे प्रकार सर्वत्र पाहण्यास मिळत आहे अवैद्य दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे आहे मात्र मागील सहा महिन्यात एकाही अनधिकृत दारू विक्रेत्यावर व चायनीज सेंटरवर दारू विकणाऱ्या व रेस्टॉरंटवर अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे कागदोपत्री आढळून येत नाही केवळ लाखो रुपयांचा अनधिकृत रित्या दारू विक्रेत्यांकडून हप्ता घेण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी करीत असल्याने रेल्वे स्टेशन परिसर,बसस्थानक,मोंढा परिसर,रेल्वे गेट परिसर,मुदखेड रोड,दिवशी खु,किनी,मातुळ,मोघाळी, भोसी या ठिकानी तालुक्यात जागोजागी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे याबाबत अनेक नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी करीत नाहीत आमच्याकडे अपुरे संख्याबळ आहे एवढेच कारण सांगून अनधिकृत रित्या दारू विक्रेत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ते टाळत आहेत मात्र याच अनधिकृत दारू विक्रेत्यांकडून मात्र महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता वसूल करण्याचे सत्र थांबवत नाहीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी खेडोपाडी दारू विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाद होण्याचे प्रसंग घडण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मात्र झोपी गेल्याचे सोंग करत आहेत तालुक्यात अनेक गावात अनधिकृत रित्या विकली जाणारी दारू ही दारू दुकान,वाईन शॉप मधून खरेदी केली जाते व वाईन शॉप मध्ये खरेदी करून आणत असताना त्या विभागातील पोलीस यंत्रणेला याची पूर्ण कल्पना असते मात्र एखाद्या दारू विक्रेत्याकडे दारू प्राशन करण्याचा परवाना नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना अनधिकृत रित्या हॉटेल्स,उपाहारगृहे मध्ये दारू विकणाऱ्या व दारू प्राशन करणाऱ्या मद्यपी वर का कारवाई केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याचप्रमाणे अनधिकृतरित्या दारू दुकान ,वाईन शॉप मधून मोठ्या प्रमाणावर दारू वाहतूक केली जाते हे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकाऱ्यांना पूर्णपणे माहीत असताना ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतात असा सवाल नागरिक विचारत आहेत राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बे जबाबदारपणाच्या धोरणामुळे लोकसभा निवडणुका या सुरळीत पार पाडतील का अशी शंका व्यक्त केली जात आहे याबाबत बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षक कार्यालयात भ्रमणध्वनीवर चौकशी केली असता या ठिकाणचे निरीक्षक संपर्के क्षेत्रा बाहेर असल्याचे कळले