अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणा-यास पकडले..पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे गुन्हा दाखल

अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणा-यास पकडले ३३,७५० रू. चा वाळलेला गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही ०१ इसमाविरुध्द NDPS कायदा अन्वये पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे गुन्हा दाखल

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली . जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि श्री. विकास पाटील यांना दिले होते.

त्या अनुषंगाने दिनांक १८/०४/२०२४ रोजी सपोनि राजेश मलपिलु यांचे पथकाला आखाडा बाळापुर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम नामे यादव संभाजी भडंगे हा अवैधरित्या गांजा बाळगुन असुन विक्री करत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशा च्या पोलीस पथकाने पंचासह दुपारी ०३.२५ वा दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी नवी आबादी वारंगा फाटा येथे इसम नामे यादव भडंगे यांचे घरी गेले असता नमुद इसम घरी मिळुन आला व पोलीस पथकाला त्याचे ताब्यात विक्री करीता बाळगुन असलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला वाळलेला गांजा वनज १.३५ कि. ग्रॅ. किमती ३३, ७५० रू चा मिळून आला. त्यावरून पोस्टे आखाडा बाळापुर येथे नमुद इसमाविरूध्द कलम २० (ब) ii एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. . राजेश मलपिलु, पोउपनि शिवाजी बोंडले, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, हरीभाउ गुंजकर यांनी केली आहे.

Google Ad