मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा गुन्हयातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत ३६,०७,४५०/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत

मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील पो.स्टे. चे गुन्हयातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवुन एकुण ३६,०७,४५०/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत

मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री. जी श्रीधर सा. यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करणेबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करुन जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस पतर करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या.

त्याअनुषंगाने दिनांक ३०/४/२०२४ रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्हयात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल, फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली

असुन सदर मोहीमे दरम्यान जिल्हयातील एकुण ०२ गुन्हयातील सोन्या चांदीचे दागीने व नगदी असे किमती ८७,९५०/- रु. ११ मोबाईल किंमती १,०९,५००/- व १५ वाहने किंमत ३४,१०,०००/- रु असा एकुण ३६,०७,४५० /- रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा चार्ज घेतल्यापासून आतापावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवून एकुण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन एकूण ४,०२,५९,०३७/-(चार कोटी दोन लाख एकोणसाठ हजार सदोतिस रुपये) चा मुद्देमाल फिर्यादीस फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री.जी. श्रीधर सा.मा अपर पोलीस अधीक्षक, अर्चना पाटील, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा विकास पाटील, पोह/६० प्रेमदास चव्हाण व सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.स्टे.चे मुद्देमाल मोहरील यांनी अधक परिश्रम घेवुन पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक, तथा जनसपंर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली

Google Ad