अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करणा-यास पकडले १२,००० रू. चा अंमली पदार्थ (गांजा) जप्त स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची मोठी कार्यवाही
पोलीस अधीक्षक,हिंगोली .जी.श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विक्री विरुध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि . विकास पाटील यांना दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक १८/०५/२०२४ रोजी स्थागुशावे सपोनि राजेश मलपिलु यांचे पथकाला वसमत शहर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, वसमत शहरातील कौठा रोड भागात इसम नामे शेख वहीद शेख जायेद हा अवैधरित्या गांजा बाळगुन असुन विकी करत आहे. अशी माहिती मिळाल्यावरून स्वागुशा च्या पोलीस पथकाने पंचासह दुपारी १८.०० वा दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी कौठा रोड वसमत शहर येथे इसम नामे शेख वहीद यांचे घरी गेले असता नमुद इसम घरी मिळुन आला व पोलीस पथकाला त्याचे ताब्यात विक्री करीता बाळगुन असलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला अमली पदार्थ (गांजा) वजन ४८० ग्रॅ. किमती १२,००० रु वा मुददेमाल मिळून आला. त्यावरून पोस्टे वसमत शहर येथे नमुद इसमाविरुध्द कलम २० (ब)ii एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पं.लीस अधीक्षक जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. . राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन व तुषार ठाकरे यांनी केली आहे.