मागील ५० वर्षापासुन विदर्भ, मराठवाडयात घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद’
“जानेवारी, २०२४ मध्ये हिंगोली येथील प्रसिध्द वकीलाचे घर फोडले होते”
वयाच्या 15 पंधराव्या वर्षापासून चोऱ्या करत होता सध्या वय 70 च्या जवळपास असल्याची माहिती
सदर गुन्हेगारास आत्तापर्यंत ०७ वेळेस घरफोडीमध्ये मा. कोर्टाने
शिक्षा सुनावली आहे.
(स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही)
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो.नि.श्री विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सुचना देवुन मार्गदर्शन करीत असतात. त्याअनुषंगाने हिंगोली शहरात दि. 02/01/2024 रोजीचे मध्यरात्री अजयनगर, हिंगोली येथे चोरी झाल्या संदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने स्था.गु.शा.चे स.पो.नि.श्री शिवसांब घेवारे यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्था.गु.शा. पथकामार्फत सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु होता. दिनांक 21/05/2024 रोजी स्था.गु.शा. चे पोलीस पथक पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची
माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे हरिदास कुंडलीक भगत, वय 60 वर्ष, रा. भेंडगाव, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला याने दि. 02/01/2024 रोजीचे मध्यरात्री अजयनगर, हिंगोली येथे चोरी केली आहे व तो पुन्हा चोरी करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसर, हिंगोली येथे आल्याचे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील आरोपीस ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन आरोपीची गुन्हयासंदर्भाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचेकडुन गुन्हयात चोरलेले नगदी व गुन्हयात वापरलेले साहित्य लोखंडी चाकु, लोखंडी रॉड, स्कु ड्राईव्हर, बॅटरी, गुलेर असा मुद्देमाल तपासकामी जप्त करून, गुन्हा उघड करण्यात आला आहे.
सदर गुन्हेगार हा मागील 50 वर्षापासुन पुर्ण विदर्भ व मराठवाडयात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असुन, जवळपास 25 घरफोडयाचे रेकॉर्ड उपलब्ध झाले आहेत.
तसेच सदर आरोपीस मा. न्यायालयाने आता पर्यंत 07 घरफोड्यामध्ये दोषी ठरवुन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी कारावास भोगुन सुटल्यानंतर पुन्हा घरफोड्या करण्याचे सवयीचा आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा.अपर अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, स्था.गु.शा. पथक, हिंगोली यांनी केली आहे.