भोकर जवळ झालेल्या कार अपघातात 1महिला दगावली दोघे गंभीर जखमी: 4 दिवस झाले गुन्हा दाखल नाही

भोकर (तालुका प्रतिनिधी )भोकर शहरापासून जवळच किनवट रोडवर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या महिलेच्या अंगावर भरधाव वेगातील कार धडकल्याने झालेल्या अपघातात 1 महिला दगावली तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 25 मे 2024 रोजी सकाळी घडली मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही
घटनेबाबत माहिती अशी की किनवट तालुक्यातील कंचेली येथील रहिवासी महिला सोनाबाई अजय जाधव वय 24 वर्ष व सुलोचना इंदल राठोड वय 45 वर्ष रा.बेलगाव जि.कुबेर,उदल सुभाष जाधव( 22 वर्ष)रा.बेलगाव जि.कुबेर हे सर्वजण मोटार सायकल क्रमांक टी एस 18 जी 41 94 44 वर बसून नांदेड कडे जाण्यासाठी निघाले असता भोकर जवळ किन्हाळा पाटीच्या जवळ गाडी उभी करून रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी थांबले होते,रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या कार क्रमांक एम.एच.26 ए.के.5189 या कारने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घालून जबर धडक दिली त्यामध्ये सोनाबाई अजय जाधव वय 24 वर्ष रा.कंचेली ता.किनवट ही गंभीर जखमी झाली होती तिला गंभीर जखमी अवस्थेत नांदेडला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला,सुलोचना इंदल राठोड यांचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने ते गंभीर जखमी झाले व उदल सुभाष जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तेही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नांदेड येथे खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत
अपघात प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल होईल- पो.नी.मारकड

सदर अपघात 25 मे 2024 रोजी सकाळी 9.30वाजताच्या दरम्यान घडल्यानंतर जखमींना घेऊन सर्व नातेवाईक नांदेडला गेले मयताचा शवविच्छेदन अहवाल येण्यासाठी उशीर झाला व फिर्याद देण्यासाठी संबंधित कुणी आले नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही सदर प्रकरणांमध्ये रीतसर गुन्हा दाखल केल्या जाईल अपघात केलेल्या कारला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी दिली आहे

Google Ad