ओबीसी आरक्षण बचाव च्या मागणीसाठी भोकर मध्ये आगळे वेगळे आंदोलन: चितेवर बसून आमरण उपोषण
भोकर (तालुका प्रतिनिधी)मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये सगेसोयरे संदर्भात जी.आर काढू नये या मागणीसाठी भोकर मध्ये 20 जून 2024 रोजी आगळे वेगळे आंदोलन सुरू होणार असून चितेवर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा संजय दिगंबर गौड आलेवार रा.भोकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात मराठा समाजाला सगे सोयरे या सबबीखाली आणि एकूणच ओबीसी आरक्षणातून जी.आर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हालचाली चालू केल्या असून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचा हक्क हिरावल्या जाईल त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात सगे सोयरे च्या नावाखाली घुसखोरी नको त्यासाठी लोकशाही मार्गाने भोकर तहसील कार्यालयासमोर चितेवर बसून आमरण उपोषण सकल ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीने करणार असल्याचे संजय दिगंबर गौड यांनी निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी भोकर पोलीस स्टेशन भोकर यांना देण्यात आले आहेत