पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक यांनी केली राहण्याची सोय

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

हिगोली जिल्हा राज्य राखीव पोलीस दल हिंगोली येथे सध्या भरती प्रक्रिया चालू असून बाहेरून आलेले परंतु राहण्याची व्यवस्था नसलेली उमेदवार हे बस स्टॅन्ड रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी निवास करताना मिळून आल्याने माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचे संकल्पनेतून, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांच्या आदेशाने हिंगोली पोलीस दलातर्फे संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे गरजू उमेदवारासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गरजू उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.. निवास व्यवस्था पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, राखीव पोलीस निरीक्षक शेख, रापोउपनी मुळतकर , गजानन राठोड यांनी केली आहे..

Google Ad