मा.नागनाथ घीसेवाड यांनी शेवटची विधानसभा लढवणार!
भोकर:-येथील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व सुख ;दुखात अविरतपणे झटणारे सहभाग नोंदवणारे व प्रत्येकाच्या सुखा:दुखात धावून जाणारे लोकनेता म्हणून परिचित असलेले नागनाथ रावजी घिसेवाड हे जनतेच्या आग्रहास्तव ही शेवटची विधानसभा लढवणार असे पत्रकारांशी बोलताना व्यक्त झाले.यांना वाढदिवसाच्या आत्तापर्यंत त्यांनी भल्या भल्या राजकीय वसा असणाऱ्या राजकारणांच्या विरोधात तीन वेळेस विधानसभा लढवली व भल्या भल्या राजकारणांना सळो की पळो करून सोडले पण काही विघ्न संतोष्टी राजकारण्यांनी चुकीच्या माध्यमातून अपप्रचार करून अवघ्या हजार दीड हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला जरी पराभव झाला तरी कुठेच खचून न जाता त्याच उमेदीने त्याच जोशाने येणाऱ्या 2024 ची विधानसभा बलाढ्य धन दांडग्या राजकारणाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेऊन सज्ज झालो आहे असे ते म्हणाले तरी भोकर विधानसभा मतदारसंघ हा केव्हा काय करेल व कोणाच्या पारड्यात झुकते माप देईल याकडे मात्र सर्वांचे बारकाईने लक्ष लागून आहे एकीकडे भाजपाकडून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण ह्या भावी आमदार म्हणून मतदार संघ पिंजून काढत आहेत तरी त्यांना मतदारसंघात एक मराठा लाख मराठा या जरांगे पाटलाच्या मावळ्याकडून तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत आहे, अशातच भावी आमदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक असून तेथे कोणाचा नंबर लागेल हे सांगणे कठीण असले तरी मतदारसंघात घीसेवाड यांना मात्र सहानुभूती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धी न करता घीसेवाड यांचा अनुभव पाहता ऐन वेळी कोणता गनिमी कावा घिसेवाड करतील व काय जादूची कांडी फिरवतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अशी सर्वसामान्य जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकण्यात येत आहे.