लामकाणी येथील गावठाण क्षेत्रातील  विना परवानगी सागवान झाडे, व नर्सरीचे झाडे तोडून रस्ता केले..

मौ. लामकानी ता.भोकर जिल्हा नांदेड येथील गावठाण क्षेत्रातील  विना परवानगी सागवान झाडे, व नर्सरीचे झाडे तोडून रस्ता केले बाबत त्वरित कार्यवाही करण्याची निवेदणाद्वारे मागणी.  थोडक्यात माहिती अशी की निवेदनात नमूद केले आहे की भोकर तालुक्यातील लामकानी क्षेत्रातील गावठाण व परिसरातील परवानगी न घेता  सागवान झाडे व नर्सरी ची झाडे तोडून केशव जगदेवराव जाधव व पोलीस पाटील बाबुराव पांडुरंग जाधव यांच्या संगण मताने गायरान जागेतून रस्ता करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा अंतर्गत नियमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बालाजी पालेपवाड यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.यासोबतच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आदींना ही प्रतिलिपी देण्यात आली आहे.

Google Ad