रेणापूर ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर पडला

ग्रामसेवक व सेवकावर कार्यवाही करा :- डॉ कानिंदे

डॉ. कैलास कानिंदे ग्रामपंचायत सदस्य रेणापूर यांनी फोन केला असता प्राप्त माहिती अशी की, महात्मा गांधी जयंती साजरी केली का असे सेवक मुबीन पठान ला विचारणा केली असता म्हणाला ग्रामसेवक व सरपंच होते म्हणाला फोटो पाठव म्हटल्यावर फोटो रोजगार सेवक विनोद कडे आहेत म्हणाला तेंव्हा विनोद ला फोन केला असता माझ्याकडे फोटो नाहीत म्हणाले तेंव्हा परत सेवक मुबीन पठान ला फोन केला तेव्हा म्हणाला विनोद चा फोन लागत नाही म्हणून उडवा उडवीचे उत्तर दिले डॉ. कैलास कानिंदे यांनी मला का बोलाविले नाही असे म्हणल्यावर मला काही माहित नाही. सेवकास दुपारी ३ वाजता फोनवर ग्रामपंचायत ला या मला म.गांधी जयंती कुठे केली दाखवा ग्रामपंचायत उघडून दाखवा म्हणाल्यावर मी शेतात आहे असे उत्तर सेवक मुबीन पठान यांनी दिले.व पुन्हा फोन बंद करून ठेवला असल्याने सदरील ग्रामसेवक , सेवक , सरपंच उपसरपंच यांच्यावर योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी डॉ. कानिंदे यांनी केली आहे ग्रामपंचायतीचा निष्क्रीय दृष्टिकोनास कोण जबाबदार आहे. याचा तपास करावा. ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना म . गांधी जयंतीचा विसर पडल्यामुळे यांना तात्काळ निलंबीत करावे, असे रेणापूर येथील ग्रामस्थामध्ये चर्चा होत आहे.

Google Ad