सामाजिक बांधिलकी जपुन निर्भिडपणे सर्व क्षेत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकाराप्रती कृत्यन्यता व्यक्त करणारा दिवस म्हणजे ६ जानेवारी. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त तमाम पत्रकारांचा अनेकांकडून सन्मान केला जातो.पण आपल्या राजकीय जिवनात मोलाचा वाटा उचलणार्या पत्रकारांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व भोकरच्या आ.श्रीजयाताई चव्हाण यांनाच विसर पडला आहे असे दिसत आहे.
भोकर तालुक्यातील पत्रकार हे सामाजिक बांधिलकी सह राजकिय व सांस्कृतिक विवीध तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मांडतात.विशेष राजकीय बातम्याना प्राधान्य देत अनेक पक्षाची बाजू मांडतात.लोंकाना आपल्या लेखनीतून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.अशा निर्भिड लेखणी चालणार्या पत्रकारांचा सन्मान व्हावा व त्यांना ही आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन आपणाला कोणी तरी कौतुकाची थाप द्यावी असे वाटते.परंतु या मतदारसंघाचे आमदार श्री जया चव्हाण व जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांचा सन्मान केल्याचे दिसत.निवडणुक असो कि विकास कामांचे भूमिपूजन असो यासाठी यांना पत्रकार दिसतो.पण ज्यावेळेस पत्रकारांच्या सन्मानाचा दिवस उजाडतो त्या वेळेस यांना विसर पडतो.खरे तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ६ जानेवारीच औचित्य साधुन पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप जरी मारली तरी मोठा आनंद पत्रकारांच्या चेहर्यावर दिसुन येईल.परंतु तसे होताना दिसत नाही.चव्हाण कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवत सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती विभाग, शिक्षण विभाग, नगरपरिषद विभाग,एम एस इ बी विभाग , आरोग्य विभाग यांना ही पत्रकारांचा विसर पडल्याचे दिसून येते.६ जानेवारी रोजी पत्रकारांचा सन्मान केलाच पाहिजे असे तरी सध्या आम्हाला वाटते.असो….