नांदेडमध्ये साहित्य–कला क्षेत्राला नवी दिशा राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेअंतर्गत समिती गठीत; बाबुराव पाटील यांची निवड

माजी मुख्यमंत्री खा आशोक चव्हाण व पालकमंत्री अतुल सावे यांच्या शिफारशी नुसार निवड

भोकर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत कलाकारांची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खा आशोक चव्हाण यांच्या शिफारशीनुसार व नांदेड चे पालकमंत्री अतुल सावे यांनी भोकर येथील ‘सकाळ’चे बातमीदार साहित्यिक बाबुराव पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.शासन निर्णयानुसार या बाबत योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.गेल्या तीन दशकांपासून साहित्य, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले बाबुराव पाटील हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात साहित्य क्षेत्रातील सक्रिय योगदानाबरोबरच ढोलकी–तबला वादन,गायन,चित्रकला तसेच वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याच्या ध्येयाने ते कार्यरत असून सामाजिक भान जपणारे अष्टपैलु व्यक्तीमहत्व कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे कलाकारांच्या निवडीसाठी गठीत समितीत त्यांच्या समावेशामुळे साहित्य व कला क्षेत्राला सकारात्मक दिशा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कला-संस्कृती जपणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा सहभाग या योजनेला अधिक परिणामकारक ठरेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन सन्मान योजनेचा लाभ पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने मिळावा,यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. या निवडी मुळे जिल्हया सह पाटील यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे