हदगाव येथे भगवान विश्वकर्मा व साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा: विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण

आ. कोहळीकर यांनी घोषित केला 60 लाखाचा निधी
*-**********************************************
खा.नागेश पा.आष्टीकर यांचेकडून संरक्षण भिंतीसाठी15लाख रू.
*-*-**-*-*-**************************************
हदगाव ( तालुका प्रतिनिधी ) शहरातील द्वारका नगरी नगर येथे विराट विश्वकर्मा प्रभू व साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 12 एप्रिल 2026 रोजी संत महंतांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक सोहळ्याने करण्यात आली.
हदगाव शहरातील दानशूर व्यक्ती गणेश तोष्णीवाल, प्रभाकर पत्तेवार, किरण मामीडवार, राजू रायवार, मामडे, यांच्या सहकार्यातून विश्वकर्मा बांधव इतर समाज बांधवांनी देखील मंदिर बांधकामासाठी महत्त्वाचे सहकार्य दिले तीन दिवस धार्मिक विधी कीर्तन भजनाचे कार्यक्रम झाल्यानंतर 12 एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नारायण महाराज पांचाळ यांचे काल्याचे किर्तन झाले कार्यक्रम स्थळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या संरक्षण भिंतीसाठी 15 लाख रुपयाचा निधी घोषित केला, आमदार बाबुराव कोहळीकर यांनी 60 लाखाचा निधी घोषित करून मदतीसाठी मी तयार आहे असे आश्वासन दिले. संदीप कासार पाटील यांनी मंदिर बांधकामासाठी 1 लाख रु. देणगी दिली या सोहळ्यास दत्तबर्डी संस्थांचे महंत गोपाळगीर महाराज, शिवलिंग शिवाचार्य महाराज, योगी दत्ताबापू कृष्ण मंदिर, परमेश्वर महाराज शिरंजणीकर,नागठाण येथील शिवाचार्य महाराज आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमास विश्वकर्मा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आर.के.दाभडकर, प्रा.नागोराव पांचाळ, बालाजी खर्डे पाटील,दत्तात्रय पांचाळ, पत्रकार बी.आर.पांचाळ,, सत्यनारायण पांचाळ जुनीकर, गणेश मुटकुटवाड, अविनाश गव्हाणकर, आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबाराव कुंभकर्ण, संजय शंकुरवार, निरंजन दहेकर,ज्ञानेश्वर रावते, गोविंद कुंभकर्ण, विठ्ठल शिंदे, रामराव अंबळकर, पुंडलिक कुंभकर्ण यांच्यासह सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

Leave a Reply