भोकरचे नगराध्यक्ष दंडवे यांचा लिंगायत संघाकडून पुण्यात गौरव
भोकर : येथील नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवान दंडवे यांचा राष्ट्रीय विरशैव लिंगायत संघाच्या वतीने रविवारी पुणे येथे गौरव करण्यात आला. यावेळी समाजाच्या अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती. गेल्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या महानगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी विजय मिळवला. समाजाप्रती असलेली आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र विरशैव लिंगायत संघाच्या वतीने पुणे येथील डेक्कन हार्डीकल हास्पीटल शिवाजीनगर येथे माजी मंत्री, आमदार विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भोकर येथील विरशैव समाजाचे जेष्ठ मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केल्याने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विविध विजय या सोहळ्यात राज्यातील ठिकाणी मिळवलेल्या ७७ नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यकमास माजी मंत्री तथा आ. डॉ. विनय कोरे, बाबा कल्याणी, खा. अजित गोपछेडे, खा. डॉ. शिवाजी काळेगे, भाजपाचे संजय कौडगे, आ. प्रवीण स्वामी, आ. सचिन कल्याण शेट्टी, सौ. शिल्पा खोत, देवाभाऊ कोठुळे, डॉ. त्र्यबंक दापकेकर, संगमेश्वरबाचे यांच्यासह अनेकांची आभार…
