भोकर ग्रामीण रुग्णालयात निवासी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा अभाव.रुग्णालयांमध्ये २४ तास सेवा मिळाली पाहिजे असा शासकीय नियम आहे.परंतु हा नियम..भोकर ग्रामीण रुग्णालयासमात्र लागू होत नाही की काय?

भोकर ग्रामीण रुग्णालयाला मान्यता मिळाली.यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा मिळाली. परंतू भोकर शहराचा विस्तार वाढला आहे.याशिवाय भोकर तालुक्यातून तब्बल तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यातील दोन राष्ट्रीय महामार्ग भोकर शहरातून जातात.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील जखमींना उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले.यामुळे भोकर येथील ग्रामीण रूग्णालय हे रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीने तोकडे ठरत आहे.या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर केले असता रुग्णांना पुरेशाप्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध होती.यासाठी जिल्हा प्रशासन भोकर विधानसभा मतदारसंघ, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.डॉक्टर्स, कर्मचारी नाहीत भोकर ग्रामीण रुग्णालयात निवासी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. रुग्णालयांमध्ये २४ तास सेवा मिळाली पाहिजे असा शासकीय नियम आहे.परंतु हा नियम भोकर ग्रामीण रुग्णालयासमात्र लागू होत नाही की काय? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. यासाठी सदरील रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास येथे तज्ञ डॉक्टर,सोनोग्राफी एकस रे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.पण ते नावा पुरतेच आहे त.याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष देले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.