बक्षी कमिटीच्या अहवालाची जेएनपीटी मध्ये होळी.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )जेएनपीटी येथे देशातील प्रमुख बंदर कामगार वेतन करार समितीमध्ये बक्षी कमिटीने सादर केलेल्या अहवालाची होळी करून निषेध व्यक्त केला गेला.
वेतन करार समितीचे सदस्य आणि भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, जेएनपीटीचे कामगार ट्रस्टी रवी पाटील यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन केले गेले . बक्षी समितीच्या या अहवालात कामगार विरोधी अनेक जाचक अटी असून कामगारांना लागू असलेल्या पूर्वीच्या फॅसिलिटी कमी करण्याचा डाव आहे.अशा या कामगारांच्या हिता विरोधी असणाऱ्या बक्षी कमिटीच्या विरोधात कामगारांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करून या विरोधात घोषणा देऊन आपला विरोध दर्शविला.या कामगार विरोधी बक्षी कमिटीच्या अहवालाला देशपातळीवर प्रखर विरोध करण्याचे नियोजन भारतीय मजदूर महासंघाच्या वतीने विशाखापट्टणम येथे 11 जुलै रोजीच्या बैठकीत करण्यात आले होते, त्यानुसार जेएनपीटी येथे भारतीय मजदुर महासंघाच्या वतीने,सर्व पदाधिकारी आणि कामगार यांनी बक्षी अहवालाच्या विरोधी घोषणाबाजी करत आपले निवेदन जेएनपीटी प्रशासनाला दिले.यावेळी जनार्दन बंडा,मंगेश ठाकूर,गणेश कोळी, नंदू कडू, बी.के.ठाकूर,इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.