काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आणि पुन्हा एकदा त्यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे सर्व भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे म्हणूनच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यामध्ये उरण शहर काँग्रेस कार्यालय येथे फटाके वाजवून, ढोल ताशाच्या गजराने, पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. त्याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा केला.यावेळी महेंद्र घरत यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटले. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनाही पेढे वाटण्यात आले. फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

 

यावेळी महेंद्र घरत- रायगड जिल्हाध्यक्ष ,मिलिंद पाडगावकर-वरिष्ठ उपाध्यक्ष रायगड जिल्हा,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, कोकण विभाग फिशर मॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा,विनोद म्हात्रे उरण तालुकाध्यक्ष,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,महिला तालुकाध्यक्ष – रेखा घरत,महिला तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,कमलाकर घरत अध्यक्ष रायगड जिल्हा सेवादल,उरण शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर,सुनील काटे काँग्रेस कार्यकर्ते,सदानंद पाटील केगाव विभागीय अध्यक्ष,गोपीनाथ मांडेलकर अध्यक्ष उरण तालुका सेवादल,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,अफशा मुखरी अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,चंदा मेवाती,माजी नगरसेवक बबन कांबळे,भालचंद्र घरत अध्यक्ष विधानसभा मतदारसंघ,रामकृष्ण म्हात्रे, लंकेश ठाकूर, शैलेश तामगाडगे,रेखा धनश्रे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad