अशोक चव्हाण यांच्या कन्येला निवडून द्या-सूपरस्टार पवन कल्याण..


भोकर(प्रतिनिधी)तेलंगणाचे मूख्यमंत्री दिलेले अश्वासन पाळत नाहीत तेथील जनता त्यांच्या कार्यावर नाराज असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व सामान्यांसाठी विविध योजना राबवून देश प्रगतीपथावर नेत आहेत त्यामूळे महायूतीचे लोकसभेचे उमेदवार व विधान सभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांची कन्या श्रिजया चव्हाण यांना निवडून देण्याचे अवाहन तेलंगणाचे उपमूख्यमंत्री तथा सूपरस्टार पवन कल्याण यांनी केले.ते पाळज येथे महायूतीकडून आयोजीत केलेल्या जाहिर सभेत बोलत होते.यावेळी आ.रामराव पाटील खा.अशोकराव चव्हाण अमिता चव्हाण प्रविण गायकवाड भगवान दंडवे संतूकराव हंबर्डे दिवाकर रेड्डी नामदेव आयलवाड बाबूराव सायाळकर आदिंची उपस्थिती होती. पूढे बोलताना पवन कल्याण म्हणाले कि,तेलंगणाचे मूख्यमंत्री विविध योजना राबविण्याचे अश्वासन जनतेला दिले भूलथापाला जनता बळी पडली काँग्रेसचे सरकार सत्तेत आले सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या सरकारकडून घोर निराशा झाली दिलेले अश्वासन पाळले नाही त्यामूळे तेथील जनता सरकावर नाराज असल्याचे सांगून महाराष्ट्रातील महायूती सरकारने लाडकी बहिण योजना अंमलात आणून महिलेच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये देण्यात येते.शेतकर्‍यांचे विज बिल माफ करण्यात आले शेतकरी सन्मान योजना आरोग्यासाठी रुग्णांना मोफत उपचार दिल्या जाते विविध कल्याणकारी योजना महायूती सरकारकडून राबविल्या जात आहे त्याकरिता पून्हा विधानसभेच्या उमेदवार श्रिजया चव्हाण यांना व लोकसभेची पोटनिवडणूकीचे उमेदवार संतूकराव हंबर्डे यांना विजयी करा असे अवाहन सूपरस्टार पवन कल्यान यांनी केले आहे.सूत्रसंचलन रामचंद्र मूसळे यांनी केले.

Google Ad